

Marathi Entertainment News : समकालीन भारतीय रंगभूमीवर बहुचर्चित 'भूमिका' हे क्षितिज पटवर्धन लिखित नाटक आता अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्णमध्य साधणारे हे नाटक आता खऱ्या अर्थाने 'मॉडर्न क्लासिक' ठरले आहे.
विविध प्रकारच्या अस्मिता टोकदारपणे जपणाऱ्या अराजकसदृश समकालीन पर्यावरणात मानवतेचे, विवेकाचे आणि प्रामाणिकपणाचे मूल्य ठसठशीतपणे अधोरेखित करणाऱ्या या नाटकात प्रबोधनाची अफाट क्षमता आहे आणि म्हणूनच या नाटकाचा समावेश करण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळाने घेतला आहे.