Ajanta Verul Film Festival 2025 : शेतकऱ्यांच्या संघर्षाची ‘दिशा’
Disha Film : ‘दिशा’ (१९९०) हा चित्रपट ग्रामीण भागातील लोकांच्या संघर्षावर आधारित आहे, ज्यात बेरोजगारी, स्थलांतर आणि सामाजिक असमानता यावर प्रकाश टाकला आहे. चित्रपट शहरी शोषण आणि ग्रामीण स्वप्नांच्या हरवलेल्या वाटा दर्शवितो.
स्थलांतर, बेरोजगारी, सामाजिक असमानता आणि ग्रामीण जीवनातील वास्तव, यावर प्रकाश टाकणारा दिशा (१९९०) हा चित्रपट आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या, त्यांचे शहरात होणारे शोषण आणि त्यांच्या हरवलेल्या स्वप्नांचे चित्रण वास्तववादी पद्धतीने केले आहे.