
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. २००८ पासून सुरू असलेल्या या मालिकेची जादू अजूनही आहे. या मालिकेची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे कार्यक्रमातील कलाकार आणि पात्र. गोकुळधाम सोसायटीमधलं प्रत्येक पात्र वेगळं असल्याने प्रेक्षकांनी हा कार्यक्रम उचलून धरला. मात्र याला उतरती कळा तेव्हा लागली जेव्हा मालिकेतील दयाबेन हा कार्यक्रम सोडून गेली. चाहते अजूनही तिच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. मात्र आता दयाबेन कधीही कार्यक्रमात परत येणार नसल्याचं सांगितलं जातंय.