
MARATHI ACTORS DIVORCE
ESAKAL
सेलिब्रिटी जोडप्यांमधला घटस्फोट हा बॉलिवूड प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. मात्र आता मराठी इंडस्ट्रीमध्येही अनेक कलाकार घटस्फोट घेताना दिसतायत. गेल्या आठवड्याभरात दोन मराठी कलाकारांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. ज्यामुळे प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला. शुभांगी सदावर्ते तिच्या संगीतकार पतीपासून वेगळी झाली. तर गायक राहुल कुलकर्णीदेखील आपल्या पत्नीपासून वेगळा झाला. या दोघांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगली. मात्र याआधीही अनेक मराठी कलाकारांनी घटस्फोट घेत चाहत्यांना धक्का दिला होता.