Divya Pugaonkar Marriage: सध्या लग्नाचा सिझन सुरु असल्याने सर्वसामान्यापासून सिनेअभिनेते लग्नबंधनात अडकत आहे. अनेक सेलिब्रिटी लग्न करुन आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. .मालिकाविश्वातील कलाकारदेखील आपल्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. अशातच, मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या पुगावकर लवकरच लग्न करणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाची पत्रिका देखील शेअर केली आहे..दिव्याने लग्नपत्रिका शेअर करत 'अक्षय आणि दिव्या save the date' असं कॅप्शनही दिलं आहे. परंतु लग्न कोठे, कधी याबाबत तिने कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तिच्या पोस्टवर देखील चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडत लग्नाबाबत विचारणा केली आहे..दिव्याचा नवरा आहे तरी कोण?दिव्या पुगावकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत आहे. 19 डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा तिलक समारंभ पार पडला. त्यानंतर दिव्याला सतत लग्नाबाबत चाहत्यांकडून विचारणा केली जात होती. यावर दिव्याने लवकरच लग्नाबाबत खुलासा करेल असं सांगितलं होतं. अखेर तिने नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लग्नाची पत्रिका शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे..सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने सुरू केला स्वतःचा व्यवसाय! अलिबागच्या 'या' गावात आहे होम स्टे, अभिनेता म्हणतो- .दिव्या पुगावकर नेहमीने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांमधून ती घराघरात पोहचली आणि लोकप्रियही झाली. त्यामुळे चाहत्यांच्या मनात दिव्याच्या लग्नाबाबत अधिक उत्सुकता आहे..दुसऱ्यांदा आई होणार लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत दिली गुड न्यूज, नेटकरी म्हणतात- .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.