

divyanka tripathi on dhanpat uncle
esakal
दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असतानाच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. दिवाळीच्या एक दिवस आधी तिच्या इमारतीला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत इमारतीचे सुरक्षा रक्षक धनपत अंकल यांचा मृत्यू झाला. या घटनेने दिव्यांका आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत या दुर्घटनेची आठवण सांगितली. दिव्यांकाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता ज्यात ती धनपत यांना तिच्या मुलांचे चेहरे दाखवत होती. तिच्या चांगुलपणाचं कौतुक झालं होतं. मात्र आता तो व्यक्तीच या जगात नाहीये.