

DNYANADA RAMTIRTHKAR
ESAKAL
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतील लोकप्रिय मालिका ज्ञानदा रामतीर्थकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्ञानदाचा नुकताच साखरपुडा झालाय. आणि लवकरच ती खऱ्या आयुष्यात बोहोल्यावर चढणार आहे. ज्ञानदाने दोन दिवसांपूर्वी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. आता साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानदाने चाहत्यांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे.