
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर ऑगस्ट महिन्यातही तीन नवीन कार्यक्रम सुरू होणार आहेत. मात्र या मालिकांसाठी जुने कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यातही झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये टीआरपीची मोठी शर्यत पाहायला मिळते. टीआरपीमध्ये वर राहण्यासाठी या वाहिन्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणताना दिसतात. मात्र त्यांना टक्कर देतं ते कलर्स मराठी. सध्या कलर्स मराठीचा टीआरपी कमी असला तरी लवकरच तो वर येणार आहे. कारण कलर्सवर लवकरच 'बिग बॉस मराठी' सुरू होणार आहे.