
'सैराट' हा चित्रपट म्हटलं की थिएटरमध्ये असलेली तुडुंब गर्दी आठवते. या चित्रपटाने पुन्हा एकदा मराठी सिनेमा जिवंत केला होता. या चित्रपटाने सिनेसृष्टीला नवीन चेहरे दिले. त्यात आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आज कित्येक वर्षांनंतरही या सगळ्यांची तितकीच चर्चा होते. चित्रोतात लंगड्याची भूमिका करणारा तानाजी गळगुंडेदेखील तितकाच गाजला. मात्र या सिनेमासाठी त्याला किती पैसे मिळालेले ठाऊक आहे का? या पैशांचा आकडा आणि त्याने त्या पैशांचं काय केलं हे त्याने स्वतः सांगितलंय.