
vinod khanna
esakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारे लोकप्रिय अभिनेते विनोद खन्ना हे कायम त्यांनी आयुष्यात केलेल्या गोष्टींमुळे चर्चेत राहिले. प्रेक्षक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करायचे. त्यांचे अनेक चित्रपट हे सुपरहिटच्या यादीत आहेत. ते सिनेसृष्टीतले गाजलेले अभिनेते होते. ते कायमच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. आधी चित्रपट, मग अध्यात्म आणि पुन्हा चित्रपट यामुळे ते चर्चेत राहिले. मात्र त्यांचा मृत्यू कसा झालेला हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्यांच्या आयुष्यातील मोठं सत्य त्यांनी प्रेक्षकांपासून लपवून ठेवलेलं.