

VICKY KAUSHAL AND KATRINA KAIF
ESAKAL
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी चाहत्यांना आज आनंदाची बातमी दिली. आज ७ नोव्हेंबर रोजी विकी आणि कतरिना यांच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालंय. अभिनेत्रीने आज एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली आहे. त्यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अनेक कलाकारांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा पाउस पाडलाय. विकी आणि कतरिना यांच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण होत आहे. कतरिनाने वयाच्या ४२ व्या वर्षी मुलाला जन्म दिलाय. मात्र त्यांच्या वयात किती वर्षाचं अंतर आहे ठाऊक आहे का?