

bigg boss 19
esakal
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक असणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. सध्या या कार्यक्रमाचा १९ वा सीझन सुरू आहे. हा सीझनदेखील सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतोय. बिग बॉसचे सगळेच सीझन जोरदार गाजतात. फार कमी काळात या शोला आणि त्यातील स्पर्धकांना लोकप्रियता मिळते. आता १७ ऑगस्ट पासून बिग बॉसचा १९ वा सीझन सुरू झालाय. यावेळीही घरात अनेक स्पर्धक आले. मात्र प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांच्या गळ्यात असणाऱ्या माइकबद्दल एक नवीन माहिती समोर आलीये. या माइकची किंमत आता समोर आलीये जी स्वतः सलमानने सांगितलीये.