
मराठीसोबतच हिंदी मालिका आणि वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. तो मराठीसोबतच हिंदी चाहत्यांचादेखील लाडका आहे. त्याने 'खतरों के खिलाडी' मध्ये सहभागी होत चाहत्यांची मनं जिंकली होती. त्याने अनेक मराठी चित्रपटात काम केलंय. आता तो लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र कित्येकांचा क्रश असणाऱ्या गश्मीरची स्वतःची क्रश कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? नुकत्याच घेतलेल्या प्रश्न उत्तरांच्या सेशनमध्ये त्याने याचं उत्तर दिलंय.