Bollywood Entertainment News : अभिनेता गोविंदाला त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून अपघाती गोळी लागली आणि त्याच्या पायाला जखम झाली. सध्या तो हॉस्पिटलमध्ये भरती असून त्याच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट डॉक्टरांनी शेअर केली. मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवले.