
Marathi Entertainment News : मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत नाहीत, तर मानवी मनोव्यापाराचा अचूक अभ्यास, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी शैली यांचं प्रभावी मिश्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवतं.