
Entertainment News : एक दोन नाही तर तब्बल तीन दशकं टेलिव्हिजन गाजवणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा कार्यक्रम म्हणजे सीआयडी. एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत आणि इतर सीआयडी टीम यांची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या मनातून कमी होत नाहीये. काही महिन्यांपूर्वीच सीआयडी कार्यक्रमाचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सीजनमध्ये सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच मालिकेत प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचा कमबॅकही पाहायला मिळाला.