

drishyam 3 the conclusion
ESAKAL
अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम ३ : द कन्क्लुजन’ आज, २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोसाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केलीये. दरम्यान, सोशल मीडियावरही चित्रपटाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) आपला अनुभव शेअर केला आहे आणि चित्रपट कसा होता याबद्दल सांगितलंय.