Duniyadari: टीक टीक वाजते डोक्यात...11 वर्षांनी पुन्हा रिलीज होतोय 'दुनियादारी', पण कोणत्या थिएटरमध्ये? जाणून घ्या...

Marathi Movie: 11 वर्षानंतर दुनियादारी हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे.
11 वर्षांनी पुन्हा रिलीज होतोय दुनियादारी, पण कोणत्या थिएटरमध्ये? जाणून घ्या...
Duniyadarisakal

Duniyadari Re Release: दुनियादारी (Duniyadari) या चित्रपटाचा समावेश मराठी सिनेसृष्टीतील सुपहिट चित्रपटांच्या यादीत होतो. या चित्रपटातील गाणी, या चित्रपटातील डायलॉग्स आणि या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला. आता 11 वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे. या चित्रपटातील कलाकारांनी या चित्रपटाच्या रि-रिलीजची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

कुठल्या थिएटरमध्ये रिलीज होणार दुनियादारी?

ठाणे, भिवंडी, कांदिवली, घाटकोपर, मरिन लाइन्स, हिंजेवाडी, बंड गार्डन रोज, अकुर्डी येथील थिएटर्समध्ये दुनियादारी हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे. नुकतीच अभिनेता अंकुश चौधरीनं याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकुशनं लिहिलं, "११ वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये… दुनियादारी" आता प्रेक्षक दुनियादारी चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक झाले आहेत.

दुनियादारीची स्टार कास्ट

दुनियादारी या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे कानेटकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं. या चित्रपटातील जिंदगी जिंदगी,टिक टिक वाजते,यारा यारा,देवा तुझ्या गाभाऱ्याला या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यामधील जिंदगी जिंदगी हे गाणं सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे,केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, प्रसाद ओक या कलाकारांनी गायलं आहे.

दुनियादारी 2 कधी होणार रिलीज?

काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरनं दुनियादारी-2 बद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं,"खरंतर आम्ही दुनियादारी सिनेमाच्या सिक्वेलवर काम करतोय. मी ही गोष्ट आधी कोणत्याही मुलाखतीमध्ये रिव्हील केली नाहीये. मी पहिल्यांदा या शोमध्ये बोलतेय." आता प्रेक्षक दुनियादारी-2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com