ipitar web series
sakal
पाली - मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष घर केलेल्या ‘इपितर’ या चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय आणि लाडके पात्र ‘आर्थिंग्या’ आता नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटात आर्थिंग्याची मुख्य भूमिका साकारणारे तसेच टाईमपास चित्रपटातील मलेरिया दादूस फेम अभिनेते जयेश चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली असून, यामुळे त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का मिळाला आहे.