

eetha song ajay atul
esakal
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी 'इठा' चित्रपटातील 'जीजी रे जी' हे गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्याला संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. मात्र, गाणं ऐकल्यानंतर अनेक मराठी संगीतप्रेमींना त्यांच्या एका जुन्या आणि लोकप्रिय गाण्याची आठवण होत आहे. विशेष म्हणजे, हे गाणं अजय-अतुल यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे. कोणता आहे ते गाणं? tarkesh_imtk इंस्टाग्राम युझरने याबद्दल लक्षात आणून दिलं आहे.