Ek Do Teen Char: क्युट लव्हस्टोरीत झालाय गोंधळ फार, 'या' दिवशी रिलीज होणार एक दोन तीन चार !

Marathi Movie: ‘एक दोन तीन चार' या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.
क्युट लव्हस्टोरीत झालाय गोंधळ फार, 'या' दिवशी रिलीज होणार  एक दोन तीन चार !
Ek Do Teen Charsakal
Updated on: 

Ek Do Teen Char: बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) आणि झिम्मा-2 (Jhimma 2) च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार' (Ek Do Teen Char) हा नवा चित्रपट येत्या 19 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

‘एक दोन तीन चार' या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. तरुण पिढीच्या आयुष्यात प्रेम, लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो याची खोचक पेरणी यात केलेली आहे.

‘एक दोन तीन चार' ची स्टार कास्ट

तसंच दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे. वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर यात असणार आहेत. या चित्रपटात निपुण आणि वैदेही ही जोडी पहिल्यादांच एकत्र पाहायला मिळणार आहे. आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीयावरचा इन्फ्लुन्सर, स्टार ‘करण सोनावणे‘ प्रथमच या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमात पदार्पण करीत आहे. या सगळ्यातील महत्त्वाचं वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर हा हरहुन्नरी दिग्दर्शक 'एक दोन तीन चार' हा एक मजेशीर, आगळावेगळा चित्रपट घेऊन येत आहे.

चित्रपटाबद्दल वरुण नार्वेकर म्हणतात, ‘नुकतचं लग्न झालेल्या समीर (निपुण) आणि सायलीला (वैदेही) यांना आयुष्याकडून एक मोठं सरप्राईज मिळतं. यामुळे सुरुवातीला दोघांनाही प्रचंड आनंद होतो. पण नंतर हळूहळू त्याचं टेन्शनही जाणवायला लागतं. आता हे सरप्राईज नेमकं काय आहे ते लवकरच फिल्मच्या प्रमोशनमधून प्रेक्षकांना कळेलच! लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात येणारा हा अनोखा ट्विस्ट बघायला सर्वांना नक्की आवडेल."

चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे. जिओ स्टुडिओजसोबत या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे.

आजच्या तरुण पिढीसोबत सर्वच वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टुडिओजचा "एक दोन तीन चार“ हा चित्रपट धमाल मनोरंजनाची मेजवानी ठरणार हे नक्की!

क्युट लव्हस्टोरीत झालाय गोंधळ फार, 'या' दिवशी रिलीज होणार  एक दोन तीन चार !
Hari Namacha Danka: वाजणार हरिनामाचा डंका! सयाजी शिंदेंचा चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
Char Dham Yatra 2026 crosses 6 million pilgrims as seasonal temple closures approach and winter darshan arrangements continue at designated locations.
दुष्काळात गोरगरीबाच्या ताटातील तांदूळही कमी!  शेजारी जिल्ह्यांत दोन किलो तांदूळ,धाराशिवमध्ये मात्र एकच किलो; तीन महिन्यांपासून धान्य वाटपात फरक दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर शासनाकडून मीठ;  प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी:
badrinath dham new
Marathi News Esakal
www.esakal.com