मराठी नृत्यनाट्याच्या प्रेमात पडले पंकज त्रिपाठी; ‘एक तिची गोष्ट’ पाहून कलाकारांना दिली खास दाद

Pankaj Tripathi Attends Marathi Dance Drama’s 25th Show Of Ek Tichi Goshta: मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या एका अनोख्या नृत्यनाट्याची दखल आता बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही घेतली गेली आहे.
ek tichi goshta

ek tichi goshta

esakal

Updated on: 

मराठी रंगभूमीवरील वेगळ्या विषयांवर आधारित कलाकृतींना प्रेक्षकांसोबतच चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचाही प्रतिसाद मिळताना दिसतो. असाच एक खास अनुभव ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाट्याच्या टीमला मिळाला. या नृत्यनाट्याने नुकताच २५ प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला. या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी उपस्थित होते. नृत्य, अभिनय आणि भावनांच्या माध्यमातून सादर झालेल्या या कलाकृतीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी संपूर्ण सादरीकरणाचं कौतुक करत ‘अद्भुत’ अशा शब्दांत कलाकारांना दाद दिली.

Loading content, please wait...