दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

Eka Lagnachi Dusri Goshta Latest News : मराठी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या अनेक मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट.
eka lagnachi dusri goshta story behind mukta barve swapnil joshi Marriage episod Marathi Entertainment news
eka lagnachi dusri goshta story behind mukta barve swapnil joshi Marriage episod Marathi Entertainment news

Eka Lagnachi Dusri Goshta Latest News : मराठी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या अनेक मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने सगळ्यांचंच मन जिंकलं. एकत्र कुटूंबात राहणाऱ्या घनाची आणि विभक्त कुटूंबातून आलेल्या राधाची भन्नाट गोष्ट असलेली ही मालिका सगळ्यांनाच खूप आवडली. या मालिकेतील त्यांच्या लग्नाचा एपिसोड खूप गाजला आणि नुकतीच एका पॉडकास्टमध्ये या मालिकेच्या टीमने या एपिसोडची खास आठवण शेअर केली.

द क्राफ्ट या युट्युब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेच्या टीमने हजेरी लावली. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशीने राधा-घनाच्या लग्नाच्या एपिसोडची खास आठवण शेअर केली. या लग्नातील सगळेच सीन प्रेक्षकांना आवडले तर त्या दोघांचा लग्नातील लुकसुद्धा प्रेक्षकांना पसंत पडला. पण सगळ्यात जास्त लोकांना भावल्या त्या एपिसोड चित्रित करण्यात आलेल्या मंगलाष्टका.

अतिशय वेगळ्या मंगलाष्टका या एपिसोडसाठी हव्या असा आग्रह चॅनेल आणि निर्मात्यांचा होता आणि शूटिंग सुरू झालं होतं. त्यामुळे नेमकं काय करायचं याचा सगळेचजण विचार करत होते. यावेळी सतीश तारे यांनी शूटिंग फक्त दहा मिनिटांसाठी थांबवलं. त्यांनी दहा मिनिटांचा ब्रेक घेतला आणि नवीन मंगलाष्टका लिहून काढल्या आणि त्यांनी त्या स्वतः गायल्या. जेव्हा सीन सुरू झाला आणि सतीश यांनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली त्यानंतर शेवटपर्यंत सगळ्यांना खरंच रडू आलं होतं आणि सगळेचजण अभिनय, शूटिंग विसरून भावूक झाले होते अशी आठवण स्वप्नीलने या पॉडकास्टमध्ये सांगितली. विशेष म्हणजे या मंगलाष्टकांमध्ये सतीश यांनी या मालिकेत असलेल्या सगळ्या पात्रांची नावे गुंफली होती.

eka lagnachi dusri goshta story behind mukta barve swapnil joshi Marriage episod Marathi Entertainment news
Samantha Ruth Prabhu: आधी फोटोत शिरला अन् नंतर चष्मा पळवला, बालीत फिरायला गेलेल्या समंथासोबत माकडचेष्टा

तर मोहन जोशी गोरखपूरला शूटिंग करत असल्यामुळे लग्नाचा संपूर्ण सिक्वेन्स त्यांच्याशिवाय शूट करण्यात आला होता आणि फक्त शेवटी ते मांडवातच झोपले आहेत हा शेवटचा शॉट ते परत आल्यावर घेण्यात आला होता अशी आठवण या मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकरने शेअर केली.

एकत्र कुटूंब पद्धती, मुलांचं परदेशी स्थायिक होणं आणि लग्नसंस्था यावर भाष्य करणारी ही मालिका प्रेक्षकांना आजही तितकीच आवडते.

eka lagnachi dusri goshta story behind mukta barve swapnil joshi Marriage episod Marathi Entertainment news
Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com