
लोकप्रिय हिंदी अभिनेता राम कपूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने केलेलं एक वक्तव्य चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. रामची 'बडे अच्छे लगते हैं' ही मालिका प्रचंड गाजली होती. यात त्याच्यासोबत अभिनेत्री साक्षी तन्वर देखील होती. मात्र या मालिकेमध्ये एक इंटिमेट सीन दाखवण्यात आला होता. तेव्हा टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच या दोघांमध्ये इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता. या सीनमुळे निर्माती एकता कपूरला त्याकाळी प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सोबतच याचा फटका टीआरपीलादेखील बसला होता असं वक्तव्य रामने केलं होतं. आता त्याच्या या वक्तव्यावर निर्माती एकता कपूर चांगलीच भडकली आहे.