

TUSHAR KAPOOR AND EKTA KAPOOR
ESAKAL
वडील सुपरस्टार असूनही त्याचा गैरफायदा न उचलता बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर आणि आपल्या मालिकांमधील मेलोड्रामासाठी ओळखली जाणारी लोकप्रिय दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूर ही इंडस्ट्रीमधली मोठी नावं आहेत.अभिनेते जितेंद्र यांची ही दोन्ही स्वतःच्या करिअरमध्ये यशस्वी असली तरी ते दोघेही अविवाहीत आहेत. तुषार आणि एकता यांनी सरोगसीद्वारे 'सिंगल पेरेंट्स' बनण्याचा निर्णय घेतला. एकताच्या मुलाचं रवी तर तुषारच्या मुलाचं लक्ष्य असं नाव आहे. मात्र त्यांनी लग्न का केलं नाही असा प्रश्न सगळ्यांना पडतो. आता एकताने स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलंय.