Bernard Hill Dies: 'टायटॅनिक' फेम दिग्गज अभिनेते बर्नार्ड हिल यांचं निधन

बर्नाड यांना त्यांच्या भूमिकांना अनेक पुरस्कार मिळाले. यामध्ये बाफ्टा अवॉर्ड, क्रिएटिव्ह चॉईस अवॉर्ड, ब्रॉडकास्टिंग प्रेस गिल्ड अवॉर्ड आणि इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्साठी नामांकन मिळाले होतं. त्यांच्या निधनामुळे जगभरातील चाहते हळहळले आहेत.
Bernard Hill Dies
Bernard Hill DiesEsakal

नवी दिल्लीः हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बर्नार्ड हिल यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन झालं आहे. १९९७ मध्ये आलेल्या टायटॅनिक चित्रपटाली कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथ ही भूमिका बर्नाड हिल यांनी निभावली होती.

बर्नार्ड हिल यांच्या निधनाच्या वृत्ताला बारबारा डिक्सन यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत, ''अत्यंत वेदनेने मी बर्नार्ड हिल यांच्या निधनाचं वृत्त सांगत आहे. आम्ही जॉर्ज पॉल रिंगो आमि बर्ट, विली रसेलचा अद्भूत शो १९७४-१९७५ मध्ये एकत्र काम केलं होतं. खरोखरच एक अद्वितीच अभिनेता.. भावपूर्ण श्रद्धांजली बर्नार्ड हिल'' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

टायटॅनिक आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्सः द टू टावर्स या सिनेमांशिवाय बर्नार्ड हिल यांनी अनेक नावाजलेल्या भूमिका निभावल्या. यामध्ये द स्कॉर्पियन किंग, द बॉयज फ्रॉम काऊंटी, गोथिका, विंबल्डन, द लीग ऑफ जेंटलमेन एपोकॅलिक्स, जॉय डिव्हिजन, सेव एंजेल होत, एक्सोडस आणि वाल्किरी या चित्रपटांचा समावेश आहे.

Bernard Hill Dies
MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

बर्नाड यांना त्यांच्या भूमिकांना अनेक पुरस्कार मिळाले. यामध्ये बाफ्टा अवॉर्ड, क्रिएटिव्ह चॉईस अवॉर्ड, ब्रॉडकास्टिंग प्रेस गिल्ड अवॉर्ड आणि इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्साठी नामांकन मिळाले होतं. त्यांच्या निधनामुळे जगभरातील चाहते हळहळले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com