MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Harbhajan Singh and Irfan Pathan Slams MS Dhoni IPL 2024 : रविवारी धरमशाला मैदानावर झालेल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्स संघावर 28 धावांनी मात केली आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखले.
Irfan Pathan on MS Dhoni News Marathi
Irfan Pathan on MS Dhoni News Marathisakal

Harbhajan Singh and Irfan Pathan Slams MS Dhoni IPL 2024 : रविवारी धरमशाला मैदानावर झालेल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्स संघावर 28 धावांनी मात केली आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखले. चेन्नईचा हा सहावा विजय होता तर सातव्या पराभवासह पंजाबच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला.

Irfan Pathan on MS Dhoni News Marathi
Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

मात्र, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनी गोल्डन डकचा बळी ठरला. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आणि लवकर आऊट झाला. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगही माहीवर संतापला आणि त्याने धोनीला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला. आणि 2015 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा माजी खेळाडूही माहीवर भडकला.

Irfan Pathan on MS Dhoni News Marathi
MS Dhoni: धोनी IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा पहिलाच! फलंदाजी करताना झाला गोल्डन डक, पण यष्टीरक्षणावेळी रचला विश्वविक्रम

पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यानंतर धोनीबद्दल वक्तव्य करताना सध्या स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करणारा हरभजन सिंग म्हणाला की "जर एमएस धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर त्याने खेळू नये. त्याच्यापेक्षा एकाद्या वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करणे चांगले आहे.

Irfan Pathan on MS Dhoni News Marathi
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या विजयाने पाँइंट्स टेबलमध्ये उलटफेर, प्लेऑफची शर्यत झाली रंगतदार

तर भारतीय अष्टपैलू इरफान पठाण म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्जसाठी एमएस धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात काही अर्थ नाही. मला माहित आहे की तो 42 वर्षांचा आहे आणि जबरदस्त फॉर्मात आहे. पण त्याने मोठी जबाबदारी घेतली पाहिजे. त्याने किमान 4-5 षटके फलंदाजी करावी. तो शेवटच्या दोन षटकात फलंदाजी करण्यासाठी येतो.

इरफान पठाण पुढे म्हणाला, होय, एमएस धोनीने मुंबईविरुद्ध प्रभाव पाडला, पण इथे जेव्हा संघाला त्याची गरज होती तेव्हा त्याने शार्दुल ठाकूरला पुढे पाठवले. धोनीला ९व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तुम्ही पाहू शकत नाही. 15व्या षटकात समीर रिझवीही बाद झाला. धोनीला कुणीतरी सांगावं, ये मित्रा, 4 ओव्हर्स बॅटिंग कर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com