
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिने धूम, युवा, काल, नो एंट्री यांसारख्या चित्रपटांमधून स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.
ईशा आणि पती भरत तख्तानी यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी, ते दोन मुलींच्या सहपालनाची जबाबदारी एकत्र पेलतात.
अलीकडील मुलाखतीत ईशाने प्रेम, सहजीवन आणि पालकत्वाविषयी मनमोकळे विचार मांडले आणि मुलांच्या भल्यासाठी पालकांनी एकत्र राहणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.