

rekha
esakal
बॉलिवूडमधील सदाबहार सौंदर्यवती आणि दिग्गज अभिनेत्री म्हणून रेखा यांची ओळख आहे. ९० च्या दशकात रेखा यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि मोहक रूपाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली, ज्यामुळे पडद्यावर त्यांची जोडी चाहत्यांना खूप पसंत पडत असे. मात्र इतर कलाकारांसोबत त्या चांगल्या वागत असल्या तरी काही अभिनेत्रींसोबत त्यांचे खटके उडत होते. त्यांचा वाद इतका विकोपाला जाई की दुसऱ्या अभिनेत्री रेखांसोबत काम करण्यास नकार देत. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने रेखा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितलेला.