
झारखंडमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनोज डे याने एका पांढऱ्या फॉर्च्युनर कारने ऑटोला धडक दिली. या अपघातात मनोज डे हे थोडक्यात बचावला. या घटनेत दोन जण जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर एसएनएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर प्रसिद्ध यूट्यूबर मनोज डे फरार झाला आहे. ही घटना तिसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदकुईया मोडजवळ घडली.