madhavi nemkar comeback
esakal
Premier
चाहत्यांच्या गळ्यातलं ताइत, खलनायकांची खलनायिका पुन्हा परत येतेय; कोण आहे ती अभिनेत्री? तुम्ही ओळखलंत का?
POPULAR ACTRESS COMEBACK : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिला पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
छोट्या पडद्यावर एखादा कलाकार गाजला की प्रेक्षक त्याला सहसा विसरत नाहीत. टीव्ही हे सर्वाधिक लोकप्रियता मिळवण्याचं साधन बनलंय. मालिकेतील कलाकार हे प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनतात. जे नायक नायिकांसाठी होतं तेच खलनायक आणि खलनायिकांसाठीही होतं. जितकी लोकप्रियता मुख्य अभिनेत्री आणि अभिनेत्याला मिळते तितकीच लोकप्रियता इतर कलाकारांना देखील मिळते. विशेषतः खलनायिकांना तर प्रेक्षक मुळीच विसरत नाहीत. अशाच एका गाजलेल्या खलनायिकेची छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा एंट्री होणार आहे.

