

KAJALMAYA
esakal
Star Pravah New Serial: गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर काही नवीन कार्यक्रम सुरू झाले. त्यात स्टार प्रवाहनेदेखील नवीन मालिकांची मुहूर्तमेढ रोवली. 'लपंडाव' आणि बी'नशीबवान' नंतर आता आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 'बिग बॉस मराठी ४'चा विजेता अक्षय केळकर याची नवी मालिका 'काजळमाया' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अभिनेत्री रुची जाईल मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय यात एका मराठीच्या प्रोफेसरची भूमिका साकारतोय. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना एका बॉलिवूड चित्रपटाची आठवण आलीये.