
deepika padukone replacement in kalki
esakal
काही दिवसांपूर्वी 'कल्की २८९८ एडी' च्या सीक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर पडल्याची बातमी आली आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला. ती बाहेर पडण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण निर्माते आणि दीपिका यांच्यात मानधन आणि कामाच्या वेळांबाबत जुळवून न आल्यामुळे तिने हा चित्रपट सोडल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी निर्मात्यांनी तिला काढल्याचं देखील म्हटलं गेलं. मात्र आता या चित्रपटात तिच्याजागी नेमकं कोण दिसणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्या भूमिकेसाठी चाहत्यांनीदेखील काही नावं सुचवली आहेत.