

Farhan Akhtar Movie Ott Release
esakal
Marathi Entertainment News : भारताची सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन सेवा असलेल्या प्राइम व्हिडिओने आज ‘120 बहादुर’ या प्रेरणादायी युद्धनाट्याच्या जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा केली. भारतीय लष्कराच्या इतिहासातील एका असामान्य अध्यायावर आधारित हा चित्रपट दिग्दर्शक रजनीश ‘रेझी’ घई यांनी दिग्दर्शित केला असून, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) तसेच अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांनी त्याची निर्मिती केली आहे.