Entertainment News : तुम्हाला माहिती आहे का की, भारतीय सेना दरवर्षी रिझांगला येथील शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करते. आता फरहान अख्तरची '१२० बहादूर' ही अज्ञात पण थक्क करणारी कहाणी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे..एक्सेल एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘१२० बहादूर’ — भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक विस्मरणात गेलेली पण अत्यंत शक्तिशाली शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. लडाखच्या गोठवणाऱ्या थंडीतील बर्फाच्छादित रिझांगला भागात १९६२ मधील भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा, १३ कुमाऊँ रेजिमेंटमधील १२० जवानांवर केंद्रित आहे — ज्यांनी हजारो शत्रूंच्या वेढ्यात असतानाही पाठीशी न फिरवता आपली जागा अखेरच्या श्वासापर्यंत लढवत राखली..या लढ्याच्या केंद्रस्थानी होते मेजर शैतान सिंह भाटी PVC, जे न बोलता पण अपार धैर्याने आपल्या जवानांचे नेतृत्व करत होते. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी, अत्यल्प संख्येत असूनही त्यांनी आपल्या सैनिकांसह हजारो चिनी सैनिकांविरुद्ध भीषण युद्ध दिले. ही लढाई होती शौर्याची, निष्ठेची आणि स्वाभिमानाची..केवळ तीन महिने नंतर, जेव्हा शोधपथक त्या भागात पोहोचले, तेव्हा त्यांना बहुतांश सर्वच १२० जवान त्यांच्या बंदुका हातात असलेल्या अवस्थेत, खंदकांमध्ये पडलेल्या, शत्रूकडे तोंड करून धारातीर्थी पडलेल्या आढळले..ही एक अशी गाथा आहे जी भारतीय सेना दरवर्षी आठवते. प्रत्येक नोव्हेंबरमध्ये, चुषुलजवळील रिझांग ला युद्धस्मारकावर या वीरांना सन्मानपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली जाते. मात्र, लष्करी वर्तुळाबाहेर फार थोड्यांना या अभूतपूर्व बलिदानाची पूर्ण कल्पना आहे..‘१२० बहादूर’ या चित्रपटाच्या माध्यमातून आता हे मौन संपणार आहे. ही केवळ युद्धकथा नाही — तर अडगळीत गेलेल्या धैर्याची, न विसरता येणाऱ्या बलिदानाची आणि न झुकणाऱ्या इच्छाशक्तीची गाथा आहे.."गजरा विकत घेतला पण.." लक्ष्मीच्या पाउलांनी मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी दाखवली 'ती' चूक ; म्हणाले...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.