फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर! 'दशावतार', 'गोंधळ' आणि 'आता थांबायचा नाय!' चा डंका; पाहा सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रींची यादी

FILMFARE AWARDS MARATHI 2026: 'फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६': अमृता खानविलकरकडून नामांकनांची घोषणा; ६ ऑगस्टला रंगणार भव्य सोहळा.
FILMFARE 2026

FILMFARE 2026

ESAKAL

Updated on

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर झाली आहेत. नामांकनांच्या शर्यतीत तब्बल २२ नामांकनांसह 'दशावतार' चित्रपटाने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आता थांबायचा नाय!' आणि 'गोंधळ' हे दोन्ही चित्रपट १९-१९ नामांकनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या नामांकनांची अधिकृत घोषणा केली. येत्या ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील 'हॉटेल सहारा स्टार' येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार असून, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com