मराठी सिनेसृष्टीतील सर्वांत महत्त्वाचा समजला जाणार 'फिल्मफेअर मराठी' पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला सिनेक्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यंदा मराठी कलाकरांसह हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकरांचाही उपस्थित होते. 10 जुलै 2025 रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार इथं हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात 'फुलवंती' या चित्रपटाला सर्वांत जास्त पुरस्कार मिळाले. तर त्यापाठोपाठ पाणी चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले.