
Entertainment News: 'एफआयआर' ,'मे आय कम इन मॅडम' या सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता संदीप आनंद याने सगळ्यांना खूप हसवलं. एका विनोदी अभिनेत्याच्या रूपात तो चाहत्यांच्या भेटीला आला. त्याने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने हसवलं असलं तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत दुःखद आहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी इतर कुणाच्याही आयुष्यात घडू नये असं तो म्हणतो. संदीपच्या पत्नीनेच त्याचा विश्वासघात करत त्याला विष दिलं होतं. आता घटस्फोटाच्या काही वर्षांनी त्याने याबद्दल खुलासा केलाय.