

kirti kulhari
ESAKAL
चित्रपट आणि ओटीटीमुळे घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री कीर्ति कुल्हारी सध्या तिच्या 'मेड'च्या पगारामुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावरील तिच्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिपमुळे नवा वाद सुरू झालाय, यामध्ये ती मेडच्या पगाराबद्दल बोलताना दिसतेय. कीर्तीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आलाय. या व्हिडिओमध्ये तिच्याकडे काम करणाऱ्या महिलेने पगार म्हणून जितक्या रुपयांची मागणी केल्याचं ती सांगते. यावरून ही रक्कम योग्य की अयोग्य असं सांगणारे दोन गट पडलेत.