
last stop khanda
ESAKAL
प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर 'लास्ट स्टॉप खांदा... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. टीजरमध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांकडे बोलते तिच्या भावना व्यक्त करते. माझं ब्रेकअप झाले आहे, मी आत्महत्या करते असं ती मुलगी म्हणते. त्या मुलीच्या मनोगतावर एक घनदाट झाड, समुद्र किनारा अशी देखणी व्हिज्युअल्स दिसतात. त्यामुळे आशय संपन्न, खुसखुशीत, हलकीफुलकी प्रेमकथा या चित्रपटातून अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत या टीजरमधून मिळतात. संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता २१ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.