
Entertainment News : प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात.
माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे.