
नव्वदीचं शतक म्हणजे प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी होतं. या दशकात अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात काही विनोदी चित्रपट होते तर काही भयपट, काही राजकारणावर आधारित चित्रपट होते तर काही प्रेमकथा. या चित्रपटांनी प्रेक्षकांचं जीवन सुसह्य केलं. याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले त्यांचे लाडके कलाकार. यात सचिन पिळगावकरपासून महेश कोठारे आणि अशोक सराफ पासून प्रशांत दामले यांचा समावेश आहे. या कलाकारांनी कालांतराने आपापल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली. कुणी अभिनेत्रींसोबत संसार थाटला तर कुणी अरेन्जमॅरेज करून बोहोल्यावर चढलं. आम्ही तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या कलाकारांचे लग्नातले फोटो आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.