
shridevi
ESAKAL
कधी हवाहवाई तर कधी चांदणी बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी या लेडी सुपरस्टार होत्या. आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. अवघ्या ४ वर्षांच्या असताना त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत राहिलं. त्यांचं लग्नही तितकंच चर्चेत राहिलं. एकदा मोना यांना भेटायला गेल्यामुळे श्रीदेवी या बोनी कपूर यांच्यावर चांगल्याच संतापल्या होत्या.