
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे? टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना दिसतेय. सुरुवातीलाच दाखवलेली पैशांनी भरलेली बॅग गायब होते आणि तिथून सुरू होतो रहस्याने भरलेला व विनोदाने सजलेला प्रवास.