Gadi No 1760 New Song Out
Premier
गाडी नंबर 1760मध्ये प्रथमेश-प्रियदर्शनीचा रोमान्स; भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीस
Gadi No 1760 New Song Out : गाडी नंबर 1760 सिनेमाचं नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. प्रथमेश परब आणि प्रियदर्शनी इंदलकरवर हे गाणं चित्रित झालं आहे.
Entertainment News : प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमात पडल्यावर मनात उमटणाऱ्या स्पंदनांना आणि गोड अनुभवांना स्पर्श करणारं हे गाणं प्रथमेश परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.