
Marathi Entertainment News : 'गदिमा प्रतिष्ठान' तर्फे दरवर्षी देण्यात येणारा गदिमा स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर करण्यात आला. तर गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली.