वडिलांना मारहाण, लेकीने स्वीकारलं १५ दिवसांत बाप्पाची मूर्ती घडवण्याचं आव्हान! ‘गणा धाव रे’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Gana Dhav Re Marathi Movie Trailer | Kedar Shinde Bharat Jadhav Ganpati Idol Making Challenge : आजपर्यंत देव भक्तांच्या हाकेला धावून आला आता भक्त बाप्पाच्या हाकेला धावून येतील अशी टॅगलाईन असलेला 'गणा धाव रे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
gana dhav re movie trailer

gana dhav re movie trailergana dhav re movie trailer

esakal

Updated on: 

सध्या मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. अशातच आता आणखी एका मराठी चित्रपटाची भर पडली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या आगामी 'गणा धाव रे' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमधील कथानक आणि संवादांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला समुद्रकिनारी पाठमोरी उभी असलेली एक व्यक्ती दिसते. त्याचवेळी आकाशात श्री गणेशाची प्रतिकृती पाहायला मिळते. त्यानंतर कथानकाला सुरुवात होते आणि बाप्पाच्या मूर्तीवरून गावात निर्माण झालेला वाद समोर येतो.

Loading content, please wait...