

gautami patil
ESAKAL
आपल्या नृत्याने चाहत्यांच्या दिलावर राज्य करणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील नुकतीच अभिजीत सावंत याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली. तिचं 'रुपेरी वाळूत' हे गाणं फार गाजलं. या गाण्यात ती अतिशय वेगळी दिसत होती. तिचा नेहमीचा लावणी हा डान्स फॉर्म सोडून ती एका वेगळ्या अंदाजात दिसली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने इतर मुलींना या व्यवसायात विचार करून येण्याचा सल्ला दिलाय.