झी मराठी वाहिनीवर देवमाणूस मधला अध्याय ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील आत्तापर्यंत भांगाना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पहायला मिळतोय. दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भूवया उंचावलेलं पहायला मिळतय. प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने देवमाणूस मालिकेत एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे नृत्य करणाऱ्या गौतमीचा अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.