
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत आयटम साँग्सना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असताना, आता ‘आंबट शौकीन’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘तंबू पिरमाचा पेटला’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यात लावणी क्विन गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. गाण्याच्या एनर्जेटिक संगीताने व नृत्याने गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.